एरंडोल येथील साहित्यिक विलास मोरे यांचे संगणकाची गाणी द्वितिय आवृत्ती प्रसिध्द

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर पिंटू राजपूत) : एरंडोल येथील साहित्यिक विलास मोरे यांच्या संगणकाची गाणी या कविता संग्रहाची दुसरी आवृत्ती दिलीपराज प्रकाशन पुणे  या प्रकाशन संस्थेने पुणे येथे प्रकाशित केली .

या बाबत प्रकाशन संस्थेकडून नुकतेच विलास मोरे यांना कळविण्यात आलेले आहे .या पूर्वी ” संगणकाची गाणी” हा बालकविता संग्रह  सन २०१७ मध्ये प्रसिद्ध झालेला  होता.संगणकावर प्रसिद्ध झालेला तो पहिलाच संपूर्ण बाल कविता संग्रह आहे.लहान मुलांमध्ये संगणकाची असलेली आवड आणि  जिज्ञासा विचारात घेऊन , तसेच या बाल कविता संग्रहाची  विविध वाचनालय व  शाळा, आणि शालेय विद्यार्थी , वाचकवर्ग यांची मागणी लक्षात घेऊन  द्वितिय आवृत्ती प्रकाशित करण्यात आली असल्याचे  प्रकाशक राजीव बर्वे व व्यवस्थापकीय संचालक मोहीत बर्वे यांनी  नमूद केले .

विलास मोरे यांची “तिसरा डोळा” ही बाल कादंबरी लवकरच दिलीपराज प्रकाशनामार्फत प्रकाशित होणार असून ही कादंबरी दोन भागात प्रकाशित होत आहे . वैज्ञानिक चमत्कृती , शोध  आणि स्त्रोत हे या कादंबरीचे कथा सुत्र असून या बालकादंबरीला प्रस्तावना “किशोर” मासिक चे संपादक किरण इंदू केंद्र यांची आहे . तर या कादंबरीच्या मागील पृष्ठावर  विवेक सबनीस , पुणे यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत .

एरंडोल येथील  औदुंबर साहित्य रासिक संघाचे अध्यक्ष अँड . मोहन बी शुक्ला , माजी अध्यक्ष विजय जाधव  यांनी विलास मोरे यांचे अभिनंदन केले असुन बाल साहित्यात विलास मोरे हे निरनिराळे प्रयोग करीत असल्याने बाल साहित्यातली वाचन प्रवृती वर्धिष्णू होण्यात मदतच होणार असल्याचे सुतोवाच केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here