दिव्यांगांना पी एम पाटील मिळवून देणार अंत्योदय योजनेचा लाभ

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या आमदार फंडातून दिव्यांगांसाठी साहित्य वाटप मोजणी शिबिरा प्रसंगी महाराष्ट्र दिव्यांग महासंघाचे अध्यक्ष पी एम पाटील सर यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, शासनाच्या अंत्योदय योजने अंतर्गत सर्व दिव्यांग बांधवांना ३५ किलो मोफत धान्य मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून लवकरच याच्या लाभ दिव्यांगांना मिळणार आहे. नावे नोंदविलेल्या सर्व दिव्यांग बांधवांना शासनाच्या नियमानुसार साहित्य पुरवण्यात येईल.

dharangaon

dharangaon-1

 

या प्रसंगी नगराध्यक्ष नीलेश चौधरी,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,भगवान महाजन,आबा महाजन,गटनेते पप्पू भावे,अक्षय महाजन,संजय पाटील,संजय धामोळे,संजीव चौधरी,किरण मराठे,सौ प्रतिभा पाटील,व्ही टी माळी सर,किरणराव जळगाव येथील तज्ञ डॉक्टर,राजू चौधरी,वासुदेव वाघ,पत्रकार योगेश पी.पाटील,बाळासाहेब जाधव,विनोद रोकडे,नंदू पाटील, शफी शाह,असलम मण्यार पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here