उद्या यवतमाळ पोलीस माजी मंत्री संजय राठोड जबाब नोंदविणार

हिंगणघाट (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : घाटंजी तालुक्यातील एक महिलेने माजीमंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्यावर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी बुधवारी (दिनांक १८) आमदार संजय राठोड यांचे जबाब नोंदविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली आहे.

घाटंजी पोलीस ठाण्यात स्पीड पोस्टाने आमदार संजय राठोड यांनी शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार पाठविण्यात आली होती. या प्रकरणी एसआयटीची स्थापन करण्यात आली होती. त्यात ज्या महिलेने तक्रार दिली, त्या महिलेचे सुद्धा जबाब १४ ऑगस्टला घाटंजी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.

माजीमंत्री संजय राठोड यांचे जबाब नोंदविल्यानंतर एसआयटी समिती दोन्ही जबाब तपासून अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे देणार आहे. त्यानंतर माध्यमाना या प्रकरणातील वस्तुस्थिती सांगितली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here