अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : पोलादपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 10/2018 भारतीय दंड विधान संहिता कलम 363, 366, 376 वगैरेसह पोक्सो कलम 4, 6 या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी देवा मारुती दगडे हा जिल्हा कारागृह अलिबाग येथे दाखल होता. नमूद आरोपीत देवा मारुती दगडे याने न्यायालयीन कोठडीत असताना Quarantine cell मधील खिडकीचे गज कापून दि.21.7.21 रोजी पलायन केले होते. सदर बाबत अलिबाग पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 118/21 भारतीय दंड विधान संहिता कलम 224 प्रमाणे आरोपीत देवा मारुती दगडे याचे विरुद्ध दिनांक 21/07/2021 रोजी दाखल आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि त्यांचे स्टाफ पो.हवा. 1088 स्वप्नील येरुणकर, पो.हवा.838 सचिन शेलार, पो.हवा.1691 देवा कोरम, पो.शि.321 अक्षय सावंत यांचे पथकाला सदर पाहिजे आरोपीत हा जेजुरी जि.पुणे परिसरातील डोंगराळ भागात लपून बसला असले बाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली.सदर बातमीचे अनुषंगाने नमूद तपास पथकाने दोन दिवस जेजुरी, सासवड,फलटण भागात आरोपीत याचा शोध घेतला असता आरोपीत हा निपाणी जि.बेळगाव राज्य कर्नाटक येथे गेला असल्याचे समजले.
आरोपीत हा धनगर समाजातील असल्याने तो निपाणी येथे बाळुमामाची मेंढरे याची पुजा करण्यासाठी गेला असल्याचे सदर पथकास समजले.नमुद पथकाने निपाणी येथे जाऊन वेषांतर करुन धनगर लोकांसोबत राहुन आरोपीत याची माहिती प्राप्त केली.सदर माहितीनुसार आरोपीत हा नालासोपारा येथे लपून बसला असल्याचे समजले. त्यानुसार स.पो.नि. धनंजय पोरे व त्यांच्या तपास पथकाने नमुद आरोपीत याचा नालासोपारा तुळिंज परिसरात शोध घेऊन त्याला आज रोजी पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांनी केलेल्या वरील कामगिरी बाबत सपोनि पोरे साहेब आणि त्यांचे स्टाफचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले






