पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आज (दि.१८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारला. महापालिकेतील स्थायी समितीची बैठक संपताच एसीबीकडून ही कारवाई करण्यात आली.
एसीबी कडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे महापालिकेत एकच खबळबळ उडाली आहे. दरम्यान, ही कारवाई नेमकी कुणावर केली गेली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
आज स्थायी समितीची बैठक असल्याने महापालिकेत ठेकेदारांची देखील मोठ्या संख्येने गर्दी होती. बैठक संपताच एसीबीच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली. या दरम्यान मनपाच्या इमारतीत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास तासभरापासून एसीबीचे अधिकारी तेथील कागदपत्रांची तपासणी करत असल्याची देखील माहिती समोर आली आहे.






