तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा, व्हीडिओ क्लिप व्हायरल..

नगर (प्रतिनिधी) : येथील महिला तहसीलदाराने आत्महत्येचा इशारा दिला आहे. वरिष्ठ आणि लोकप्रतिनिधींच्या त्रासाला वैतागलेल्याचा दावा करत तहसीलदाराने आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.

लोकप्रतिनिधी त्रास देतात. तसंच प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचवले, असं त्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.

त्यांनी दीपाली चव्हाण यांचा संदर्भ क्लिपमध्ये दिला असून आपल्याही मनात असाच विचार येत असल्याचं म्हटलंय. महिला अधिकारी म्हणून त्रास होत असल्याचं म्हणत वरिष्ठांकडून होणारं दुर्लक्ष तसंच नोकरीवर रुजू होताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात रुजू झाल्यानंतर झालेली निराशा या आणि अशा विविध गोष्टींवर त्यांनी भाष्य केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here