रेवस-करंजा तर सेवेला एसटीची संलग्न सेवा सुरू करावी – ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनची आग्रही मागणी

अलिबाग-सोगावकर – रायगड जिल्ह्यातील प्रमुख अश्या अलिबाग व उरण या दोन तालुक्याना जोडणारी रेवस करंजा जलमार्गावरील तर सेवा नुकतीच अंशतः सुरू झाली आहे, मात्र मागील वीस दिवसांपासून वादळाचा 3 नंबरचा सिग्नल व अन्य कारणामुळे ही तर सेवा बंद होती.
येत्या एक ते दोन दिवसात ही तर सेवा सकाळी 2, दुपारी 1,संध्याकाळी 2,अश्या मोजक्याच फेऱ्या मारणार आहे,तरी या तर सेवेला एसटी ची संलग्न सेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष श्री.चंद्रकांत मोकल यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी व एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी यांना लेखिपत्राद्वारे प्रत्यक्ष भेटून केली आहे,
रायगड जिल्ह्यातील प्रवासी वर्गाच्या या योग्य मागणीचा विचार करून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी एसटी महामंडळाच्या रायगड विभाग नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के याना सेवा सुरू करणे बाबत योग्य त्या सूचना केल्या, या अनुषंगाने ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागणीचा विभाग नियंत्रक यांच्याकडे पाठपुरावा केला,विभाग नियंत्रकांनी एसटी चे अलिबाग आगार व्यवस्थापक श्री वनारसे यांना प्रवाशांचा प्रतिसाद बघून सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच अलिबाग एसटी आगार व्यवस्थापक श्री.वनारसे यांची ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अलिबाग तालुका प्रमुख विकास पाटील यांनी भेट घेऊन तर सेवेसाठी एसटी च्या फेऱ्यांना प्रवासी वर्गाचा प्रतिसाद मिळणेसाठी आवश्यक असे असोसिएशनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगितले आहे,ह्या मार्गावर एसटी सुरू झाल्यास अलिबाग, उरण,मुरुड तालुक्यातील राज्य व केंद्र सरकारच्या आस्थापनातील महिला व पुरुष कर्मचारी,भारत सरकारच्या संरक्षण विभाग अंतर्गत एन.ए.डी,व शिपिंग मंत्रालय अंतर्गत जवाहरलाल नेहरू बंदरातील कर्मचारी वर्ग आणि भाजी,मच्छी विक्रेते आदी समाजाच्या सर्व थरातील आबालवृद्धांना याचा फायदा होणार आहे,सध्या मुंबई रेवस जलमार्गावर जलवाहतूक बंद आहे, यामुळे रेवस करंजा तर सेवेने उरण जोडले आहे, व तेथून पुढे ठाणे,नवी मुंबई,व मुंबई साठी सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध आहे त्याचा लाभ प्रवाशांना घेता येईल,
तरी शेकडा प्रवासी वर्गाच्या सेवेसाठी आवश्यक असलेली ही संलग्न सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी पुनःश्च मागणी चंद्रकांत मोकल यांनी एसटी प्रशासनास केली आहे,प्रवासी वर्गाने सोशल डिस्टनसिंग चे भान ठेवून, एसटी व तर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here