वेद फाऊंडेशनतर्फे पर्यावरणपूरक राखी पौर्णिमा

मुंबई(कुलाबा) (प्रमिला जाधव) – वेद फाउंडेशन द्वारा प्रत्येक वर्षी सामाजिक, सांस्कृतिक, कला व आदिवासी क्षेत्रात समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी वैश्विक महामारी covid-19 प्रादुर्भाव कारणास्तव वेद फाउंडेशन द्वारा सामाजिक मूल्यांचे जतन करत पर्यावरण पूरक राखी पौर्णिमेचे आयोजन केले गेले. ज्या अंतर्गत भारतीय गणराज्याचे महामहीम राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद, सन्माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना गोंदिया मधील लक्ष्मी गौशाला संस्था द्वारा निर्मित वैदिक गोमय राखी भेट करण्यात आली. गीर गायीच्या शेणापासून बनवलेल्या पवित्र राख्या या पर्यावरण पूरक असल्याने अत्यंत उपयुक्त असतात. या पर्यावरण पूरक रक्षाबंधनात वेद फाउंडेशन अध्यक्ष स्वप्नील वाडेकर, लक्ष्मी गौशाला संस्था प्रमुख स्मिता टेंबरे, गोंदिया जिल्ह्यातील सौ एकता मसानी, श्रीमती मंजू सराटे, रश्मी सराठे, सेजल मसानी, नागपुर जिल्ह्यातील पूजा पवार, प्रमिला जाधव इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here