भाविना पटेलने पटकावलं पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक

टोकियो : टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल हिनं देशाला पहिलं मेडल मिळवून दिलंय.रविवारी झालेल्या मॅचमध्ये तिनं सिल्व्हर मेडलची कमाई केली. भाविनाचा फायनलमध्ये ३-० नं पराभव झाला. तिचा वर्ल्ड नंबर वन पॅडलर झाऊ यिंगनं ११-७, ११-५, ११-६ असा पराभव केला. या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला मिळालेलं हे पहिलंच मेडल आहे. भाविना पटेलनं पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात रौप्यपदक पटकावणारी दुसरी भारतीय खेळाडू आहे.

यापूर्वी २०१६ साली दीपा मलिकनं ही कामगिरी केली होती. तिनं गोळाफेक स्पर्धेत ४.६१ मीटर थ्रो करत रौप्यपदक पटकावले होते. यापूर्वी भाविना पटेलनं सेमी फायनलमध्ये चीनच्या वर्ल्ड नंबर ३ खेळाडूला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. भाविनानं सेमी फायनलची लढत मोठ्या फरकाने जिंकली होती.

गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यातलं वडनगर हे भाविनाचं गाव. ६ नोव्हेंबर १९८६ रोजी तिचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. ती अवघ्या एका वर्षाची असताना तिला पोलिओ झाला. तेव्हापासून तिला अपंगत्व आलं. पाच जणांच्या कुटुंबात तिचे वडील एकटेच कमावणारे होते. त्यामुळे तिच्यावर इलाज करण्यासाठी पुरेसे पैसे त्यांच्याकडे नव्हते. नंतरच्या काळात तिच्यावर विशाखापट्टणममध्ये सर्जरी करण्यात आली, मात्र तिचं व्हीलचेअरवर बसणं चुकलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here