देवळा (प्रतिनिधी) : तालुक्यात विज वितरण कंपनीने शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे तालुक्यातील सटवाईवाडी येथील शेतकरी संतप्त झाले होते. त्यांच्या भावना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री दादाजी भुसे, उर्जा मंत्री डॉ नितीन राऊत व चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ राहुल दादा आहेर यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर संपर्क साधून सामाजिक कार्यकर्ते शेतकरी विनोद आहेर यांनी शेती व शेतकरी यांना वाचविण्याची विनंती केली आहे.






