तांबापुरा येथील मोहम्मदिया नगर हॉलच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

जळगाव (क्राइम रिपोर्टर जमील शेख) : रविवार (दि. २९) दुपारी १२ वाजता तांबापुरा जळगाव प्रभाग क्र. १५ मध्ये महापौर सौ.जयश्री महाजन यांच्या हस्ते तांबापुरा येथील मोहम्मदिया नगर हॉलच्या नूतनीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगर सेवक शबाना बी सादिक़ खाटीक विरोधी पक्ष नेता सुनील महाजन ,नगर सेवक प्रशांत नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पवित्र कुरआन पठन तौफीक अत्तारी यांनी केल्यानंतर महापौर जयश्री महाजन यांचे हस्ते श्रीफळ फोडून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला आहे.

यावेळी परिसरातील विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी वाहेद खान, सलमान सादिक खाटीक, आसिफ शाह बाप्पू, रफीक शाह सुपारीवाले, रियाज भाई काकर, जमील भाई भंगार वाले, अयाज अली, जाकिर मेम्बर, हाजी यूसुफ भाई ठेकेदार ,हिदायत खान जाकिर सैयद ,इन्दाज मिस्त्री असलम काकर इस्माइल खान इब्राहिम खाटीक यांच्यासह तांबापुऱ्यातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here