छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या महिला पोलिसावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) : हिलांवरील अत्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळं महिला पोलिसांना अधिक दक्ष राहावं लागतं. मात्र महिलांच्या रक्षणासाठी कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांवर हल्ल्याची घटना घडली आहे. या महिला पोलिसाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

अश्लील कमेंट केल्यानंतर आरोपी तरुणाला जाब विचारला असता, आरोपीने महिला पोलिसावर हल्ला केला. या हल्ल्यात महिला पोलिसाचं डोकं फुटलं असून त्या रक्तबंबाळ झाल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या काही वेळातच पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. ही घटना लखनौ जिल्ह्याच्या अलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. संबंधित महिला पोलिस या परिसरात गस्तीवर होत्या. यावेळी प्रभात सिंह नावाच्या तरुणाने महिला पोलिसावर अश्लील कमेंट केली. त्यानंतर महिला पोलिसाने तरुणाला जाब विचारला.

जाब विचारल्याच्या रागातून तरुणाने महिला पोलिसावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात महिला स्कूटवरून खाली कोसळली. हा वाद सुरू असताना एकाने जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये कळवलं. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल होत, आरोपीला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here