नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विकासयोजना राबवितांना सुसंवादाचे वातावरण ठेवले तर मोठे कार्य उभे राहते. कोकण विभाग शासकीय विकासयोजना राबवितांना राज्यात सर्व क्षेत्रात अग्रेसर असतो. असे प्रतिपादन कोकण विभागाचे महसूल आयुक्त श्री.विलास पाटील यांनी केले.
“महा आवास अभियान-ग्रामीण” अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व कामगिरीबाबत मूल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना कोकण भवन येथे “महा आवास अभियान-ग्रामीण” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळयाच्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास श्रीम.पुष्पाताई पाटील अध्यक्ष, जिल्हा परिषद ठाणे,श्रीम. वैदही विशाल वाढाण अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर, श्रीम. योगिता पारधीमा अध्यक्ष, जिल्हा परिषद रायगड,श्रीम. संजना सावंत अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, श्री.भाऊसाहेब दांडगे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.ठाणे, श्री.सिद्धराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर, श्री.डॉ.किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रायगड, श्रीम.डॉ.इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रत्नागिरी, श्री.प्रजित नायर मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सिंधुदुर्ग, श्री.गिरीश भालेराव उप आयुक्त(विकास), श्री. मनोज रानडे उप आयुक्त (सामान्य), श्री. मकरंद देशमुख उप आयुक्त (महसुल), श्री. डी. वाय.जाधव उप आयुक्त (आस्थापना), श्री.चंद्रकांत वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर , श्री.रणधीर सोमवंशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रायगड/प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, रायगड श्री.दादाभाऊ गुंजाळ प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, ठाणे, श्री.माणिक दिवे प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, पालघर, श्रीम.नंदिनी घाणेकर प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, रत्नागिरी श्री. राजेंद्र पराडकर प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, सिंधुदुर्ग आदि मान्यवर उपस्थित होते.
पारितोषिक प्राप्त संस्था पुढीलप्रमाणे
प्रधानमंत्री आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद ठाणे, द्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरी, तृतीय क्रमांक-जिल्हा परिषद रायगड.
राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरी, द्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद सिंधुदूर्ग, तृतीय क्रमांक-जिल्हा परिषद ठाणे.
सर्वोत्कृष्ट पंचायत समिती प्रथम क्रमांक-पंचायत समिती म्हसळा जि.प.रायगड, द्वितीय क्रमांक-पंचायत समिती दापोली, जि.प.रत्नागिरी, तृतीय क्रमांक-पंचायत समिती कुडाळ, जि.प.सिंधुदुर्ग,
राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट पंचायत समिती प्रथम क्रमांक-पंचायत समिती मोखाडा जि.प.पालघर, द्वितीय क्रमांक-पंचायत समिती तलासरी, जि.प.पालघर, तृतीय क्रमांक-पंचायत समिती वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग.






