तलाठी संघटनेकडून शिंदखेडा तहसीलदार सैदांणे यांना निवेदन देत,लावली गुहार
दोंडाईचा (प्रतिनिधी) : शिंदखेडा तालुका तलाठी संघटने तर्फे कृषी व इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या महसूल कामकाजा व्यतिरिक्त इतर सर्व योजनांचे काम नम्रपणे नाकारण्याचे निवेदन शिंदखेड्याचे तहसीलदार श्री सुनीलजी सैंदाणे यांना नुकतेच देण्यात आले आहे.
कृषी विभागाकडील पिक कापणी प्रयोग,टी आर ए कार्ड,कृषी गणना,पीक नुकसानीचा पंचनामा गुरांचा मृत्यू,घरांची पडझड,पर्जन्य मापाच्या नोंदी नैसर्गिक आपत्तीतील कामकाज, साथरोग प्रतिबंधात्मक कामकाज तसेच पी एम किसान योजनेचे कामे वर्षानुवर्षे कोणताही एक संबंध नसताना महसूल विभागाच्या तलाठ्यांना मार्फत राबविण्यात येत आहे. म्हणून त्या कामाचा अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यांवर येऊन महसूल चे मुख्य असलेले वसुली, गौणखनिज कारवाया, निवडणूक, संगायो, इंगायो, विविध निराधार योजना,कुटुंब अर्थसहाय्य योजना इत्यादी कामांचा महसूलच्या दैनंदिन सातबारा वितरण,फेरफार नोंदी घेणे,नियमित वसुली याच्यावर ताण पडत असल्याने व मूळ महसूलच्या कामांना वेळच मिळत नसल्याने तलाठी संघटनेने कृषिविषयक असलेले इतर कामकाज नम्रपणे नाकारत असले बाबतचे निवेदन सादर शिंदखेडा तहसीलदार सैदांणे यांना सादर केले.
यावेळी निवेदन देतांना श्री संजय गोसावी (अध्यक्ष शिंदखेडा तालुका तलाठी संघटना) श्री मनोहर पाटील, श्री मनोज गोसावी, श्री.एम एम शास्त्री, मंडळाधिकारी दोंडाईचा, श्री.व्ही एम वाघ,श्री सुभाष कोकणी,श्री राकेश पवार,श्री जगदीश निकम, श्री विजय बोरसे,श्री वी एस जगदाळे,भाऊसाहेब चव्हाण,श्री शिव गोसावी,श्री विशाल गारे,श्री बादल जारवाल,श्री विकास सिंगल,श्री सुरज भदाने,श्री संतोष अहिरे,श्रीमती अर्चना पौड, रीना खिल्लारे,कल्याणी पाटील ,मोनाली धनगर यांच्यासह तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या सह्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.



