प्रत्येक क्षेत्रात सुरक्षा ही काळाची गरज – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : अग्निशमन सेवा ही संरक्षणाची चौथी फळी मानली जात असून संकटकाळी धावून येणारा अग्निशामक दलाचा प्रत्येक जवान हा साक्षात विघ्नहर्त्याचे रूप आहे. प्रत्येक क्षेत्रात सुरक्षा ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले ते आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजीनियरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट उपक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फैजपूर मधुकर सहकारी कारखान्याचे संचालक नरेंद्र नारखेडे होते.

आयकॉन कॉलेज ऑफ फायर अँड सेफटीचे पालक मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
येथिल सी .ग . भंगाळे माध्य. विद्यालय च्या जवळ आयकॉन कॉलेज ऑफ फायर अँड सेफटी मॅनेजमेंट या कॉलेज चे उदघाटन जिल्हाचे पालक मंत्री ना. गुलाबराजी पाटील यांचे शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री यांनी फायर अँड सेफटी क्षेत्रातील वाढती मागणी व त्या क्षेत्रात असलेल्या करियरच्या संधी यावर प्रकाश टाकला तसेच या कॉलेज मध्ये प्रथमतःच मुलींनी प्रवेश घेतल्या बद्दल मुलीचे व त्यांच्या पालकांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले तसेच संस्थेच्या अद्ययावत तंत्रज्ञान व तज्ञ कर्मचारी वृंद यांचे सुद्धा कौतुक केले संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

ikon-college

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी म.स.सा. का. चे संचालक नरेंद्र नारखेडे हे होते तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे हे होते यावेळी संस्थेचे संस्थापक सत्यम दुधनकर यांनी प्रास्तविक केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा अग्निशमन विभागाचे शशिकांत बारी, प्रा अशोक महाजन ,प्रा रविराज मुसळे सोलापूर हे होते तर आभार संचालक योगेश भावसार यांनी केले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राचार्य सचिन भालेराव संजय खेडकर मोहित पाटील खुशाल पाटील नीलिमा मेंडकी आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here