जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : शिवसेना जळगाव जिल्हा सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था व युवा विकास फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षक दिनानिमित्त लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार व कोरोना योद्धा सन्मान सोहळ्याचे आयोजन सरदार पटेल लेवा भवन येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर कुमारी सेजल वाणी या विद्यार्थिनीने स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. चंद्रकांतजी सोनवणे सहसंपर्कप्रमुख रावेर लोकसभा माजी आमदार चोपडा, मा.श्री विष्णू भंगाळे शिवसेना जिल्हाप्रमुख माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक मनपा जळगाव, प्रा. समाधान पाटील जळगाव शहर विधानसभा संपर्कप्रमुख सौ. जयश्रीताई महाजन महापौर मनपा जळगाव, डॉ.श्री. अनिल झोपे प्राचार्य डायट जळगाव, श्री. शरदआबा तायडे शिवसेना महानगर प्रमुख जळगाव शोभाताई चौधरी शिवसेना महिला आघाडी महानगरप्रमुख डॉ.श्री प्रशांतजी वारके (प्राचार्य गोदारी एमबीए कॉलेज) डॉ. स्नेहल फेगडे (सचिव आयएमए) श्री.नरेंद्र सपकाळे सर शिक्षक सेना प्रमुख जळगाव सौ सविता माळी- कोल्हे महिला आघाडी श्री.महेश पाटील माजी उपाध्यक्ष ग.स. सोसायटी जळगाव हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रमुख श्री विष्णू भंगाळे यांनी करताना म्हटले की दरवर्षी शिक्षकांचा सन्मान सोहळा तसेच अनेक समाजोपयोगी कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून होत असतात. माझ्यासह आपणही शिक्षकांमुळे घडलो आहे. असे सांगितले. डॉ.अनिल झोपे यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांची राष्ट्रनिर्मितीतील भूमिका विशद करताना शिक्षक हा देशाच्या विकासाचा कणा असल्याचे नमूद केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.ना. गुलाबराव पाटील यांनी एक पुस्तक एक शिक्षक आपले जीवन बदलू शकते हे नमूद करताना शिक्षकांच्या समाजाच्या जडणघडणीतील कार्याचा गौरव केला.
कोरोना काळात डॉक्टर नर्सेस आरोग्य सेवक या सर्वांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की कोरोनाने आपल्या सर्वांचे गर्व हरण केलेले आहे. जीवन किती क्षणभंगुर झाले असल्याचे या कोरोनाने जगाला दाखवून दिले, वैद्यकीय क्षेत्रातील या देवदुतांचे आभार मानून येणारा गणेशोत्सवात संपूर्ण राज्याचे, देशाचे कोरोनाच्या भीषण संकटातून संरक्षण व्हावे, सुटका व्हावी अशी गणरायाला प्रार्थना करूया असे गणेशा चरणी प्रार्थना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.खेमराज पाटील व आभार प्रदर्शन डॉ.स्नेहल फेगडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश वारके, ललित महाजन, महेंद्र पाटील, बिपिन झोपे, प्रा.सुरेश अत्तरदे, प्रा.अतुल इंगळे,प्रा.डॉ. योगेश महाजन, प्रा. डॉ. निलेश पाटील, प्रा.उमेश पाटील,विकी काळे, शैलेश काळे, प्रशांत सुरळकर, एकनाथ पाचपांडे, स्वप्निल रडे, रोहिदास ठाकूर, निखिल चौधरी,गोविंदा लोखंडेसर, अजित चौधरी सर, राहुल चौधरी सर, नरेंद्र बोरसे सर, सचिन महाजन सर, दीपक भारंबे सर, विकी भंगाळे, ललित काळे, सुनील चंदनकर, सचिन पाटील, विजय नारखेडे, विद्यार्थी संघटनेचे गौरव भोळे, ऍड. सागर सरोदे, हर्षल चौधरी, मोहित धांडे, सिद्धार्थ कोलते यांनी परिश्रम घेतले.






