धरणगाव शिवसेना महिला आघाडी तर्फे मॉसाहेबांना विनम्र अभिवादन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगाव येथील शिवसेनेच्या तमाम शिवसैनिकांच्या माऊली मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले

या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी सन्माननीय शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होत्या याप्रसंगी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख मा.सौ महानंदा ताई पाटील, एरंडोल नगरीच्या नवनियुक्त उपनगराध्यक्ष सौ.आरती ताई महाजन, यांचा प्रमुख उपस्थितीत पुजन करण्यात आले, महानंदा ताई पाटील यांनी माॅ साहेब ह्या हिदूऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे सावली सारख्या खंबीरपणे उभ्या राहिल्या असे मनोगतात सांगितले.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष सौ.उषाताई गुलाबराव वाघ, उपनगराध्यक्ष ,सौ.कल्पना विलास महाजन, माजी प्रभारी नगराध्यक्ष सौ अंजलीताई भानुदास विसावे, नगरसेविका सौ.कीर्ती किरण मराठे तसेच महिला आघाडी शहर प्रमुख सौ.रत्ना ताई धनगर ,युवती सेनेच्या तालुकाप्रमुख कु.नेहा प्रकाश पाटील व महिला आघाडीच्या सौ.भारती चौधरी, सुनिता ताई चौधरी इत्यादी महिला उपस्थित राहुन प्रतिमेचे पुजन केले .

एरंडोल नगरपरिषदेच्या नवनियुक्त उपनगराध्यक्षा सौ आरती अतुल महाजन यांनी कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून चांगले काम केले म्हणून माॅ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या स्मृति दिवसाचे औचित्य साधून महानंदाताई पाटील व कल्पना विलास महाजन यांनी सत्कार केला.

या कार्यक्रम प्रसंगी श्री विलास महाजन, भागवत चौधरी, किरण मराठे, नंदकिशोर पाटील, सतीश बोरसे बाळासाहेब जाधव, कमलेश बोरसे,रवी जाधव, किरण मराठे ,दीपक पाटील, किरण अग्निहोत्री, पवन मराठे, प्रल्हाद चौधरी ,कल्पेश विसावे, दीपक महाजन, काँग्रेसचे नंदलाल महाजन, अरविंद चौधरी इत्यादी मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त यांच्या उपस्थितीत विनम्र आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला आघाडी प्रमुख रत्नाताई धनगर यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here