पाकिस्तानविरोधात निदर्शने करणाऱ्यांवर तालिबानकडून गोळीबार

काबुल : तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानात आपल्या क्रूरतेचे प्रदर्शन केले आहे. काबूलमध्ये पाकिस्तानविरोधी रॅलीदरम्यान जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी तालिबानकडून गोळीबार करण्यात आला आहे. मंगळवारी काबूलच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानविरोधी निदर्शने होत होती.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, तालिबान लढाऊंनी काबूलमधील प्रेसिडेंशियल पॅलेसजवळ गोळीबार केला. येथे मोठ्या संख्येने आंदोलक मोर्चा काढत होते. प्रेसिडेंट पॅलेस जवळ काबुल सेरेना हॉटेल आहे, जेथे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI चे प्रमुख गेल्या एक आठवड्यापासून मुक्काम करत आहेत.

मंगळवारच्या निदर्शनाचे कव्हरेज करणारे पत्रकार आणि कॅमेरामन यांनाही तालिबानने अटक केली आहे.अफगाणिस्तानमध्ये गेल्या एक -दोन दिवसांपासून पाकिस्तानविरोधात सातत्याने निदर्शने सुरू होती. अफगाण नागरिक पाकिस्तानकडून पंजशीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here