हाक तुमची..तक्रार निवारण सेवा आमची; जळगाव शहरातील गणेश मंडळांना महापौर कक्षाचे आवाहन

जळगाव (महाराष्ट्र सह संपादक तिलोत्तमदास बोंडे) : संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पाचे आगमन येत्या १० सप्टेंबर २०२१ रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिकसह गल्लीबोळांतील मंडळांना आवाहन, की आपण करणार असलेल्या श्रीगणेश प्रतिष्ठापना कार्यस्थळ परिसरात अस्वच्छता असल्यास थेट ‘महापौर सेवा कक्षा’शी संपर्क साधा.

या कक्षाद्वारे जळगाव शहर महानगरपालिकेतील स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत स्वच्छता कर्मचार्‍यांकडून संबंधित परिसर तत्परतेने स्वच्छ केला जाऊन श्रीगणेश प्रतिष्ठापना कार्यस्थळाचे पावित्र्य राखले जाण्यास मदत होईल.

jalgaon-mayor

आपण सविस्तर संवाद करण्यासाठी/माहिती देण्यासाठी ‘महापौर सेवा कक्ष’ हेल्पलाईन क्र. 95 90 269 269 यावर सकाळी ९ ते दुपारी १ व दुपारी २.३० ते सायं. ५ या वेळेत (शासकीय सुटी वगळता) कॉल करून आपली समस्या/तक्रार सविस्तर नोंदवून तक्रार निवारण करा. ‘महापौर सेवा कक्ष’ आपल्या समस्या/तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी तत्पर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here