पुण्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेला ११ जणांकडून मारहाण

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : जुन्या भांडणाच्या कारणावरून अकरा जणांनी मिळून एका महिलेला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. ९) सकाळी खेड तालुक्‍यात पुणे नाशिक महामार्गावर संतोषनगर (भाम) येथे घडली. आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानासमोर येऊन फिर्यादी यांच्या पत्नीला लाकडी काठीने, लोखंडी गजाने, लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

गुलाब बाबुराव कड (वय ५७, रा. संतोषनगर, भाम, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव शिवेकर, प्रमोद सावंत, विनायक सावंत, गुलाब शिवेकर, कुमार शिवेकर, अक्षय शिवेकर, सोमनाथ सावंत, गुलाब शिवेकर यांची पत्नी आणि इतर तीन महिला (सर्व रा. शिरोली, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here