मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : टॉलीवूड अभिनेता साई धरम तेज शुक्रवारी एका रस्ते अपघतात गंभीर जखमी झाला आहे. साई धरम तेज त्याच्या १८ लाखांच्या आणि तब्बल ११६० स्पोर्ट्स बाईकवर जात होता. तेव्हा अचानक त्याची बाईक घसरली आणि साई धरम तेज गंभीर जखमी झाला.
त्याला बेशुद्ध अवस्थेत मेडिकओव्हर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या तो धोक्याबाहेर आहे. पण त्याच्या डोळ्याजवळ, छातीवर आणि पोटावर जखम झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
#SaiDharamTej Accident Spot Cc footage pic.twitter.com/89vmhVksNI
— DONTHU RAMESH (@DonthuRamesh) September 10, 2021
मेडिकोव्हर रुग्णालयातून त्याला आता अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिथंच त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. सध्या तो व्हेंटिलेटरवर असून पुढील ४८ तास तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असणार आहे. साई तेज याचा अपघात झाल्याची माहिती मिळताच अभिनेते चिरंजीवी तात्काळ रुग्णालयात पोहोचले. धरम तेज हा अभिनेते चिरंजीवी यांचा नातेवाईक आहे. चिरंजीवी यांच्यासोबतच पवन कल्याण, अल्लू अरविंद, नागाबाबू यांनी रुग्णालयात जाऊन साई तेज याच्या प्रकृतीची विचारपूस केली.






