पर्युषण पर्वानिमित्त बाफना परिवाराची आमदार अशोक पवार यांनी घेतली शुभेच्छा भेट

पुणे (प्रतिनिधी जगदीश का. काशिकर) : रविवारी शिरुर शहरांमध्ये माजी नगरसेवक, शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बाफना यांचे नातू गौरव बाफना व त्यांची पत्नी भव्या बाफना यांनी पर्युषण पर्वानिमित्त ९ दिवस निरंकार उपवास ठेवले त्याबद्दल शिरुर हवेलीचे आमदार अँड अशोकबापू पवार यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रकाशजी बाफना, कामिनीताई बाफना व बाफना परिवारातील सदस्य तसेच पुणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, शिरुर मार्केट कमिटीचे उपसभापती प्रविणशेठ चोरडिया, शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलचे अध्यक्ष रविंद्रजी खांडरे वकिल, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष राहिल शेख, शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक अध्यक्ष राजुद्दिन सय्यद, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्याध्यक्ष हाफिज बागवान,अजयशेठ कोठारी, यूवा नेते सागर नरवडे, रवि गोसवी, व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here