वसंतदादा मल्टिस्टेट चे कार्य कौतुकास्पद – गुरुवर्य ओंकारसिंह बापू

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : वसंतदादा मल्टिस्टेट संस्थेचे कार्य अतिशय कौतुकास्पद असुन समाजातील शेवटचे घटक आर्थिक साक्षर बनविण्यासाठी काम करण्याची त्यांची जिद्द असल्याने यश निश्चित असून परमेश्वर सुद्धा अशा कार्यास मदत करतो, अशी प्रतिक्रिया श्री क्षेत्र मेथी येथील ह.भ.प.गुरुवर्य ओंकारसिंह बापू यांनी वसंतदादा मल्टिस्टेट संस्थेच्या नूतन कोपरगाव शाखेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे आमदार आदरणीय नरेंद्र भाऊ दराडे तर प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक, युवानेते आदरणीय विवेक भैय्या कोल्हे हे होते.

सर्वप्रथम सरपंच सौ. व श्री.भीमा संवत्सरकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व सत्यनारायण महापूजा करण्यात आली. यानंतर सर्व मान्यवर सभासदांच्या उपस्थितीत शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोरोना काळात ज्या सभासदांची संस्थेस मोलाची साथ मिळाली त्यांचा सन्मानचिन्ह देऊन कार्य गौरव करण्यात आला. यावेळी आमदार नरेंद्र दराडे यांनी अधिक सांगितले की,अनेक वर्षांपासून मी मुकुंद सिनगर यांचे काम पाहतो आहे, एक प्रामाणिक कार्यकर्ता असून शिवसेनेसोबत काम करत असताना कुठल्याही गटतटाचा विचार न करता समाजाप्रती काम करण्याची मानसिकता असल्यानेच आज संस्था उभी करण्याचं मोठं आव्हान पेललं आहे. मी नेहमी त्यांच्या पाठीशी असून संस्थेचे कुठलेही प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विवेक भैय्या यांनी अधिक सांगितले की, मुकुंदरावांसारखा एक चांगला कार्यकर्ता आपली शिर्डी येथील कर्मभूमी सोडून आपल्या जन्मभूमीत सक्रिय होतोय, याचा आनंद आहे. वसंतदादा संस्थेच्या सुविधा पाहता कोपरगावकरांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास व्यक्त केला. दोघांनीही संस्थेचे अध्यक्ष मुकुंद सिनगर व त्यांचे सर्व संचालक मंडळ यांच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या.

vasantdada-bank-kopargaon-branch-opening

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख आदरणीय शिवाजी राजे ठाकरे, शहरप्रमुख कलविंदर डडीयाल, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, कुलस्वामिनी पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब आढाव, HP गॅस एजन्सी चे मालक बाबासाहेब परजणे, गौतम बँकेचे माजी संचालक भाऊसाहेब पाटील सिनगर, सामाजिक कार्यकर्ते अनंत तात्या सिनगर, सहकारी संस्थेचे माजी सचिव किशोर भांगे, पत्रकार युसूफ रंगरेज, पत्रकार संजय महाजन यासह संस्थेचे संचालक किशोर परजणे, संचालक अच्युत सिनगर, संचालिका सौ.वनिता अनुप गोंदकर व सौ.सारिका मुकुंद सिनगर तसेच सौ.सुवर्णा किशोर परजणे, कार्यकारी संचालक बळीराम सिनगर, स्थानिक संचालक ज्ञानेश्वर बबरु सिनगर, सुधाकर वादे, दादासाहेब खटकाळे, आदींसह कोपरगाव शहर व तालुक्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वसंतदादा मल्टिस्टेट संस्थेने अल्पावधीतच आपल्या सभासदांना सर्वोत्तम सेवा देत सहकार क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.कोअर बँकिंग प्रणाली सह Ifsc कोड असल्याने Rtgs व Neft सुविधा, अद्यावत मोबाईल बँकिंग सुविधा, व्यावसायिकांना QR कोड सुविधा यासह ठेवींवर आकर्षक व्याजदर, सभासदांसाठी सर्व प्रकारचे कर्जसुविधा उपलब्ध असून जास्तीत जास्त सभासदांनी लाभ घेण्यासाठी आमच्या कोपरगाव शाखेत एकवेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन संस्थेचे सर व्यवस्थापक श्री.गणेश वाळुंज यांनी केले. यावेळी सर्व कुशल कर्मचारी श्री.अनिल कापसे (कर्जविभाग प्रमुख), श्याम सापिके (शिर्डी शाखा व्यवस्थापक), मंगेश रणछोड (अकोले शाखा सह व्यवस्थापक), प्रबोध सिनगर (कोपरगाव शाखा सह व्यवस्थापक)यांच्यासह लिपिक सौ.शीतल शिंदे, सौ.पल्लवी दीक्षित, श्री.रोहित डावरे यांच्यासह सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे उत्तम व्यवस्थापन केले. सूत्रसंचालन बाळासाहेब वाघ यांनी तर शेवटी संस्थेचे संचालक मा.किशोर परजणे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here