कोरोनावरील इंजेक्शनाचा काळाबाजार करुन बेकायदेशिर विक्री करणा-या आंतरराज्यीय टोळीस

मुंबई ( हितेश मिस्त्री) – दिनांक ०३/०८/२०२० रोजी कक्ष-९, गु.प्र.शा., गु.अ.वि. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना बांद्रा रिक्लमेशन यु ब्रिज खाली, रिक्लमेशन, बांद्रा (पश्चिम), मुंबई-५० याठिकाणी काही इसम हे कोव्हिड १९ च्यावेळी ऑक्सीजनचे लेवल कमी झाल्यानंतर उपचाराकरीता वापरण्यात येत असलेले इम्पोर्टेड “Tocilizumab Injection, Actemra 400 mg” ची विक्री त्यावरील किमंती पेक्षा अंदाजे दोन ते तीन पट पेक्षा जास्त दराने म्हणजे प्रती नग रु. ०१ लाखाने गि-हाईकांना विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाली.
प्राप्त झालेल्या विश्वसनीय माहितीची खातरजमा करुन कायदेशिर कारवाई करण्याकरीता कक्ष-९ चे पो.नि. आशा कोरके, स.पो.नि. सुधीर जाधव व पोलीस पथक यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या ०२ अधिका-यांसह बांद्रा रिक्लमेशन यु ब्रिज खाली, रिक्लमेशन, बांद्रा (पश्चिम), मुंबई-५० याठिकाणी सापळा रचुन Tocilizumab Injection, Actemra 400 mg इंजेक्शनची विक्री करणा-या एका इसमास आईस पॅक असलेला थर्माकॉलचा बॉक्समध्ये असलेल्या इंजेक्शनचे १५ नग छोटे बॉक्स ( किंमत अंदाजे रु. १५ लाख ) पंचनाम्याअंतर्गत ताब्यात घेतले.
नमुद इसमाकडे इंजेक्शनच्या पावती व बिलाबाबत विचारणा केली असता, त्यापैकी त्याचेकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे सांगितले. तसेच सदरचे Tocilizumab Injection, Actemra 400 mg/20ml इंजेक्शन कोठुन आणली? याबाबत विचारणा केली असता त्याने सदर इंजेक्शन हे नवी दिल्ली येथील मेडीकल चालकाच्या मार्फतीने मुंबई मध्ये प्रत्येकी एक लाख रुपयास विक्री करण्याकरीता आणले असल्याचे सांगितले. सदर बाबत केलेल्या चौकशीत नमुद इंजेक्शन ऑक्सीजनचे लेवल कमी झाल्यानंतर उपचाराकरीता वापरले जात असल्याची माहिती प्राप्त झाली. अटक आरोपीची माहिती – पुरुष वय ३० वर्षे, रा.ठि. कटोराताल मोहल्ला, काशीपुर, उद्यमसिंग नगर, उत्तराखंड.
नमुद इसमाने कोविड १९ आजाराचे औषधोपचारा दरम्यान, वापरण्यात येणारी वर नमुद औषधे बेकायदेशीर रित्या विना खरेदी बिलाने खरेदी करुन, ती अधिक किंमतीने विना विक्री बिलाने, कोणताही औषध विक्री परवाना नसताना विक्री करुन फसवणुक केली म्हणुन त्याचे विरुध्द बांद्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला व सदर आरोपीतास अटक करून नमुद गुन्हयाचा पुढील तपास कक्ष-९ करीत आहे.
अशाप्रकारे गु.प्र.शा., गु.अ.वि., कक्ष-९ च्या पथकाने खात्रीलायक बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमीची उत्तमप्रकारे शहानिशा करून एका इसमाकडुन Tocilizumab Injection, Actemra 400 mg ची १५ इंजेक्शन किं.अं.रु. १५ लाख हस्तगत करण्यात यशस्वी झाले आहे. सदर आरोपीतास मा. न्यायालयासमक्ष रिमांडकरीता हजर केले असता त्यास मा. न्यायालयाने दिनांक ०७/०८/२०२० रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केले आहे.
सदरची उत्कृष्ठ कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मुंबई श्री संदिप कर्णिक (अतिरिक्त कार्यभार मा. सह पो.आ. गुन्हे), मुंबई, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), श्री अकबर पठाण, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डी-पश्चिम, श्री राजेंद्र चिखले (अतिरिक्त कार्यभार), वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. कोरके, स.पो.नि. जाधव, स.पो.नि. धराडे, पो.उ.नि. आंबवडे, पो.ह. नाईक, पो.ह. कोळी, पो.ह. शिंदे, पो.ना. पेडणेकर, पो.ना. राऊत, पो.शि. महांगडे, पो.शि. गवते, पो.शि.चा. निकम यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here