ईमेल द्वारे पैशाची मागणी करुन कुटुंबियास जीवे ठार मारण्याच्या धमकीबाबत दाखल असलेल्या गुन्हयाची उकल

मुंबई (हितेश मिस्त्री) – बोरीवली परिसरात रहाणारे फिर्यादी हे चार्टर्ड अकाऊंटंट असून नामांकीत बँकेत उच्चपदावर कार्यरत आहेत.

फिर्यादी यांच्या पत्नीचे ईमेल अकाऊंटवर दिनांक १६/०७/२०२० ते १९/०७/२०२० या कालावधीत [email protected], [email protected], [email protected] या वेगवेगळया तीन ईमेल अकाऊंटवरुन मी चाईनिज आहे असे सांगुन प्रथम एक लाख रूपयांची व नंतर १२ मिलीयन रूपयांची मागणी केली. सदर पैसे न दिल्यास फिर्यादी, त्यांची पत्नी व लहान मुलींना जीवे ठार मारण्याची धमकी नमुद ईमेल्स मध्ये येत होती. फिर्यादी हे बँकेत महत्वाच्या पदावर कार्यरत असल्याने सदर कामाच्या संबंधाने कोणीतरी पैशाची मागणी करुन धमकावत असल्याने फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय खूप घाबरुन गेले, त्याबाबत त्यांनी दिनांक २१/०७/२०२० रोजी बोरीवली पोलीस ठाणेस तक्रार केल्याने तेथे अज्ञात इसमाविरुध्द् गु.नो.क्र. ७९२/२०२० कलम ३८७ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
कोविड १९ आजारामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सायबर गुन्हयांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने वरिष्ठांनी नमूद गुन्हा त्वरीत उघडकीस आणण्याबाबत कक्ष ११, गुन्हे प्रकटीकरण शाखेस दिल्या होत्या. सदर गुन्हयाचा अधिक तपास कक्ष ११, गुन्हे प्रकटीकरण शाखा करीत होते. सपोनि चौगुले, सपोनि झिने व सपोनि पाटील यांनी सदर गुन्हयात अज्ञात आरोपीने वापरलेले तीनही ईमेल अकाऊंटबाबत बारकाईने तांत्रिक तपास सुरु केला. तपासा दरम्यान सदरचे ईमेल्स हे फिर्यादी यांचे नांवे असलेल्या मोबाईल वरुनच झाल्याची बाब आढळली. त्या अनुशंगाने फिर्यादी यांना विश्वासात घेवून माहीती घेतली असता त्यांनी कळविले की, सध्या लॉकडाऊन असल्याने ते ऑनलाईन वर्क फ्रॉम होम करीत आहेत, त्याकरीता लॅपटॉप व मोबाईल फोनचा वापर करतात. तसेच त्यांच्या पत्नीकडे मोबाईल फोन आहे व त्यांच्या बारा वर्षीय मुलीस त्यांनी ऑनलाईन शिक्षणाकरीता मोबाईल फोन घेवून दिलेला आहे


ईमेल अकाऊंटच्या विश्लेषणात आढळलेल्या तांत्रिक माहीतीच्या अनुशंगाने फिर्यादी यांचेकडे तपास केला असता त्यांनी सदर तांत्रिक माहीतीमध्ये आढळलेला मोबाईल फोन हा त्यांची अल्पवयीन मुलगी वापरत असल्याचे सांगितले. त्यांनी दिलेल्या माहीतीस अनसरुन फिर्यादी व त्यांचे पत्नीचे समक्ष अल्पवयीन मुलीकडे चौकशी केली असता तिने सदरचे ईमेल्स केल्याचे मान्य केले. सदर ईमेल्स हे तिने आई वडीलांप्रती असलेल्या रागातून केल्याचे सांगून तिचे आई वडील हे तिच्याकडे लक्ष न देता फक्त लहान बहीणीस लळा लावतात, प्रेम करतात त्यामुळे आपणास आईवडील प्रेम करीत नाहीत, वारंवार रागावून बोलतात ही भावना मनात निर्माण झाल्याने तिचेवर प्रचंड मानसिक दडपण आले होते. आई वडीलांप्रती असलेला रागाचा बदला घेण्यासाठी, पोलीसांनी आई वडीलांना अटक करुन त्रास द्यावा या हेतूने तिने सदरचे ईमेल्स केल्याचे सांगितले. सदर बाबत बोरीवली पोलीस ठाणेस माहीती देण्यात आलेली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. संदीप कर्णिक (अतिरिक्त कार्यभार-सह पोलीस आयुक्त गुन्हे), मा. पोलीस उप-आयुक्त (प्र-१), श्री. अकबर पठाण, यांच्या मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, (प्रकटीकरण-उत्तर) श्री. राजेंद्र चिखले, प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, पो.नि. रईस शेख, पो.नि. सलील भोसले, स.पो.नि. विठठल चौगुले, शरद झिने, विशाल पाटील, अंमलदार रविंद्र भांबिड, राजू गारे, संतोष माने, श्रीमती सारीका कदम, उपेंद्र मोरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here