दोंडाईचा (संतोष कोळी) – 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. तरी शहरातील विविध धार्मिक स्थळाचे आरती प्रतिमापूजन होणार असून, जर लॉकडाऊन राहिलं नसतं तर मोठ्या प्रमाणात गर्दी राहिली असती परंतु दोंडाईच्या शहरात कोरोना चे वाढता प्रभाव पाहून नागरिकांनी आपल्या घरातच राहावे. घरातच दिवाळीसारखा सण साजरा करावा आपल्या घरातूनच रांगोळी ,गुढी उभारून , मिठाई वाटून भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडावा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. नियमाचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
तसेच व्हाट्सअप फेसबुक ट्विटर असे सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणार नाही, असे पोस्ट करू नये. नाहीतर प्रशासना कडून विविध सोशल मिडियावर लक्ष ठेवले जात असून, चुकीची पोस्ट दिसल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल.







