रोटरी सिनियर्सच्या सहकार्यामुळे चांगली सेवा देऊ – डॉ अर्जुन नरोटे

दोंडाईचा (संतोष कोळी) – रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सच्या माध्यमातून संपुर्ण कोविड वार्डात आँक्सिजन सिस्टीम तयार करुन दिली फक्त यावर ते थांबले नाहीत तर त्यासाठी आवश्यक असलेले ५ मोठे सिलेंडर भरुन दिलेत व आवश्यकतेनुसार पुन्हा भरुन देणार आहेत .
सध्यास्थितीत दोंडाईचा शहर व परिसरात कोविडचे दररोज अनेक रुग्ण आढळत आहेत व बहुतेक रुग्णांना आँक्सिजनची गरज भासत आहे त्यामुळे रोटरी सिनियर्सने केलेल्या अनमोल मदतीचे मी मनापासून आभार मानतो असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अर्जुन नरोटे यांनी सांगितले. आँक्सिजन सिलेंडर रोटरी सिनिर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया ,राजेश मुणोत , डॉ हितेंद्र देशमुख ,डॉ सचिन पारख ,राजेश माखीजा ,अँड नितीन अयाचीत, डॉ दिपक सराफ ,शेखर कोठारी,सौरव अग्रवाल,सौरभ मुणोत , महेंद्र चोपडा इ सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here