उत्तरप्रदेश (अयोध्या) (सय्यद गुलाम हुसैन) – अनेक दशकांच्या प्रतिक्षेनंतर प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी अयोध्येत आज (दि. 5) भव्य राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या बहुप्रतिक्षित सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरु आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने अयोध्येतील सुरक्षा कडक केली असून जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली आहे.
भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण अयोध्या रोषणाईने उजळून गेली होती. तसेच शरयूचा काठही सजवण्यात आला आहे. पंतप्रधान आज सर्वप्रथम हनुमानगढीत पोहोचतील. ते रामभक्त हनुमानाचे दर्शन घेतील. हनुमानगढीतर्फे पंतप्रधानांना मुकुट तसेच गदा भेट देण्यात येईल. पंतप्रधानांचे फेटा तसेच चांदीचा मुकुट घालून स्वागत केले जाईल. हनुमंताच्या आशीर्वाद स्वरूपात त्यांना चांदीची गदी भेटस्वरूपात देण्यात येईल, अशी माहिती हनुमानगढीचे मुख्य पुजारी प्रेमदासजी महाराज यांनी दिली. हनुमानगढीत पूजा केल्यानंतर पंतप्रधान श्रीराम जन्मभूमी परिसरात होणार्या भूमिपूजन सोहळ्यासाठी रवाना होतील.
लाइव्ह सोहळा (सौजन्य युट्यूब)







