रामपूर (उत्तर प्रदेश) : येथे एक नवरी लग्नानंतर दोन महिन्यांतच पतीला फसवून पळून गेली. नवरीने तिच्या पतीला दुधात नशेचे औषध मिसळून त्याला प्यायला दिले आणि त्यानंतर ती २ तोळे सोनं आणि ५० हजार रोख रक्कम घेऊन घरातून पळून गेली. त्याचबरोबर मुलीच्या माहेरच्या लोकांनी तिचा पत्ता सांगण्यास नकार दिला आहे. माहेरच्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, मुलगी कुठे गेली याची त्यांना माहिती नाही. तिचा फोनही बंद येत आहे.
घटना रामपूरच्या ठाणा गंज परिसरातील आहे. येथे एका व्यक्तीने आरोप केला आहे की, ५ ऑगस्ट रोजी रामपूर येथील एका महिलेशी त्याने सर्व रीतीरिवाजांनुसार लग्न केले होते. परंतु १० सप्टेंबर रोजी त्याची वधू फरार झाली. ती तिच्यासोबत २ तोळे सोने आणि ५ हजार रोख रक्कमघेऊन पळून गेली आहे. आता पीडितेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे आणि सीएम पोर्टलवर याबाबत तक्रार केली आहे.
गंजचा रहिवासी असलेला इरफान व्यवसायाने कारागीर आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्याचे लग्न इकरा या रामपूर येथील मुलीशी झाले होते. इरफान म्हणतात की, सर्व काही ठीक चालले होते, परंतु अचानक रात्री पत्नीने त्याच्या दुधात नशेचे औषध मिसळले आणि घरातील सामान घेऊन पळून गेली. त्याने पुढे सांगितले की, त्याने तिला एक दिवसापूर्वी माहेराहून आणले होते.पीडित तरुणाने नोंदणीकृत पोस्टद्वारे रामपूरच्या पोलीस अधीक्षकांना तक्रार पत्र पाठवले आहे. यासोबतच मुख्यमंत्री पोर्टलवरही तक्रार करण्यात आली आहे.






