तांबापूरा व फुकटपूरा भागात जबरी घरफोडी

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील तांबापुरा परिसरातील असलेल्या फुकटपूरा भागात चोरट्याने दीड लाखाचा एवज लंपास करायची घटना मंगळवारी सकाळी उघडीस आली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, चोरट्यांनी आजुबाजुच्या घरांना बाहेरून कडी लावुन डाव साधला पंचशील नगरात राहणारे सरफराज खान अयूब खान, व त्यांचा मुलगा दोन्ही खाजगी वहान चालक म्हणुन काम करतात. सोमवारी रात्रि त्यांचा मुलगा बाहेरगावी गेलेला होता रात्रि १० वाजता सुमारस खान कुटुंबयात घरात कुलुप लावुन वरील माळ्यावर झोपण्यास गेले. रात्रीच्यावेळी चोरट्यांनी खान यांच्या वरील खोलीला आणि शेजारी राहणाऱ्या इतर घराला बाहेरून कडी लावली.

daroda

खान यांच्या घराचा कडीकोंडा तोडत कपाट फोडुन १५ ग्राम सोन्याची पोत, चांदीचे कडे, चांदीची पोत, चांदीची अंगठी, १२ हजार रोख असा दीड ते दोन लाखांचा एवज लंपास केला. मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सरफराज खान, हे उठले असता दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी शेजाऱ्यांशी संपर्क साधला. शेजाऱ्यांचादेखील दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी परिसरातील इतर काही नागरिकांना संपर्क करून बोलावले. खान कुटुंबियखाली आल्यानंतर घडलेला प्रकार त्यांचा लक्षात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here