जळगाव (प्रतिनिधी) : येथील बळीराम पेठमधील राहिवासी सुरेश भोळे (वय६२) यांचे आज (दि.१४) सायंकाळी ७ वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई लिलाबाई, बहीण पुष्पाबाई, मुलगी काजल, २ मुले अश्विन, ललित व भाचा मानव असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या (दि.१५) सकाळी ९ वाजता बळीरामपेठ येथील निवासस्थानाहून निघून नेरीनाका वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते जळगावचे ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे यांचे ज्येष्ठ बंधू होत.






