सुशांतच्या आत्महत्येनंतर धनंजय मुंडेंची कोरोना वॉर्डातून भावनिक फेसबुक पोस्ट

[ad_1]

मुंबई |   बॉलिवूडचा नवोदित उमदा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी मुंबईतल्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येनंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे सध्या कोरोनाशी दोन हात करत आहेत. त्यांनी थेट कोरोना वॉर्डातून सुशांतच्या जाण्यानंतर फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

टीव्ही सीरिअल ते महेंद्रसिंह धोनीचा यशस्वी बायोपिक असा लोकप्रियतेचा कळस गाठणारा प्रवास करणारा हरहुन्नरी कलाकार आत्महत्येसारखे पाऊल उचलतो हे अनाकलनीय आहे… असं म्हणत धनंजय मुंडे यांनी सुशांतसिंग राजपूत याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सुशांत जाण्याने चित्रपट सृष्टीचं नुकसान झालं असल्याची प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला आहे. सुशांत सिंग राजपूत गेला आहे हे वृत्त कळताच मला धक्का बसला आहे. परमेश्वर हे दु:ख सहन करण्याची शक्ती सुशांतच्या कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रांना आणि त्याच्या करोडो फॅन्सना देवो, अशी मी प्रार्थना करतो असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

सुशांतच्या आत्महत्येने कला क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी सुशांतच्या घरी जात त्याचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर, तसंच त्याच्या खोलीची पाहणी करत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

पोलिसांनी सुशांतचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता खोलीत कोणतीही सुसाईट नोट आढळली नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केली, असावी असा अंदाज वर्तवला आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

राष्ट्रवादीचा ‘या’ माजी आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू, राजकीय क्षेत्रात खळबळ

‘माझं आयुष्य तुम्हाला घ्या’, बाळा नांदगावकरांची राज ठाकरेंसाठी खास फेसबुक पोस्ट

महत्वाच्या बातम्या-

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनं अक्षय कुमारला धक्का; म्हणाला…

‘आमची कधी भेट झाली नव्हती, पण…; सुशांतच्या मृत्यूवर लता मंगेशकरांनी व्यक्त केल्या भावना

सुशांतच्या जाण्याने मला धक्का बसलाय; उद्धव ठाकरेंनी वाहिली आदरांजली

 

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here