पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांशी गांधी भवन मध्ये संवाद; महाराष्ट्र गांधी स्मारक निधी , युक्रांदचा गुरुवारी कार्यक्रम

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : अफगाणिस्तानच्या अस्वस्थ परिस्थितीमुळे तेथील सर्वसामान्य माणसाचे आणि पुण्यात शिकणा-या अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून गेले आहे . या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाने संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.

हा संवाद कार्यक्रम गुरुवारी,१६ सप्टेबर रोजी , दुपारी २ वाजता गांधी भवन (कोथरूड) येथे होणार आहे .या कार्यक्रमाचे संयोजक आणि युवक क्रांती दलाचे राज्य संघटक जांबुवंत मनोहर यांनी ही माहिती दिली .

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युक्रांदचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी ,राज्य कार्यवाह संदीप बर्वे ,शहराध्यक्ष सचिन पांडुळे, रोहन गायकवाड इत्यादी उपस्थित राहणार आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here