लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) : जिल्ह्यातील बिजनौर येथे एका महिलेचं पतीसोबत भांडण झालं. पतीने तिला भांडखोर म्हटलं. तुला भांडणंच लागतात, असं पती तिला भांडणादरम्यान म्हणाला. हे शब्द पत्नीच्या जिव्हारी लागले. तिने रागात पती विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी स्वत:ची जीभ ब्लेडने कापली. त्यानंतर घरात मोठा गदारोळ झाला. महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेने इतका टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, असं मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केलं जातंय. महिलेचं नाव बबली असं आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
ही घटना ही रविवारी (१२ सप्टेंबर) दुपारी घडली. पती-पत्नीमध्ये नेमका वाद काय झाला? ते अद्याप समोर आलेलं नाही. पण दोघांची घरची परिस्थिती नाजूक आहे. त्यांना दोन मुलं आहेत. आर्थिक अडचणींमुळे दोघांमध्ये सतत वाद होत असायचा, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.






