शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : “ओबीसी सामाज्याचे” राजकीय आरक्षण राज्यातील तिघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे रद्द झाले. राज्यात येऊ घातलेल्या सहा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाज्याला डावलून तिघाडी सरकारने निवडणुका लादल्या आहे. सरकारच्या या नाकर्ते धोरणाच्या निषेधार्थ “भारतीय जनता पार्टीने” “धिक्कार मोर्चा” आयोजित केला होता.
राज्यातील तिघाडी राज्यसरकारला जाग आणण्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार तथा भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर व उ.नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली व ओबीसी मोर्चा जिल्हा प्रभारी अशोक पवार, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर तसेच तालुकाध्यक्ष स्वानंद रासने यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे, प्रदेश युवा मोर्चा सदस्य किरण बोराडे, सुधीर शिंदे, सचिन भैरवकर, राजेंद्र शर्मा, राजेंद्र ह. गोंदकर, पंडित गुडे, लखन बेलदार, तसेच भाजपा ओबीसी मोर्चा तालुका कार्यकारणीचे वैभव शिंदे, भिमराज मुर्तडक, जितेंद्र माळवदे, रंजित कडलग, नितीन वाके, विजय राहाते, कैलास खोंडे, सोमनाथ शिंदे सुभाष वराडे, किरण शहाणे, सुभाष गाडेकर, खंडेराव कडलग, भगवान गाडेकर, राहूल जंगम, राजेंद्र आव्हाड, भाऊसाहेब आहेर, भानुदास गाडेकर, सुनिल भुजाडे, विजय कासार, संतोष गाडेकर, वाल्मिक गाडेकर, विजय गाडेकर, एकनाथ गाडेकर, तालुका प्रसिद्धीप्रमुख संजय महाजन व अन्य ओबीसी समाज बांधव, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






