भुसावळ (गिरीश पवार) – तालुक्यातील साकेगाव येथील पिंटू पान सेंटर सेंटर च्या बाजूला मोटरसायकलवर राज्यात बंदी असलेला विमल गुटखा विक्री होत असताना तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सुमारे तीस हजार रुपये किमतीचा गुटखा पकडला.
पोलिसांनी मोटरसायकल ताब्यात घेत 66 हजार 635 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. साकेगाव येथील पिंटू पान सेंटर जवळ मोटरसायकलवर (वय 23) राज्यात बंदी असलेला विमल गुटखा आणि सुगंधी सुपारी मसाला विक्री करत असल्याने तो जप्त केला. त्यात 31 हजार 653 रुपयांचा गुटखा सुपारी पुढे होत्या. पोलिसांनी यावेळी भोई हा ज्या मोटर सायकलवर विक्री करत होता तीही जप्त केली आहे.असा सुमारे 66 हजार 635 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुमार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, विजय पोहकर पोहेकर, संजय मोंढे, विठ्ठल फुसे आणि जगदीश भाई यांनी ही कारवाई केली.







