कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी केले जपानी बुद्धविहारात अन्नधान्य वाटप

मुंबई (प्रमिला जाधव) – वरळी येथे पोद्दार रुग्णालयाजवळ एकमेव पुरातन जपानी बुध्दविहार आहे. जपानी नागरिकांचे हे एकमेव बुद्धविहार मानले जाते. कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे येथील भन्ते भुदीता याना या बुद्धविहाराची देखभाल आणि संगोपन करणे फार कठिण जात होते. ही अडचण समजताच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक, कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी त्वरित या बुद्धविहारात अन्नधान्याचा साठा येथील भन्ते भुदीता यांच्याकडे सुपूर्द केला. भन्ते भुदीता यांनी शिंदे आणि त्यांच्या टीमचे आभार मानून आशीर्वाद दिले.या सामाजिक कार्यात शिंदे यांच्यासोबत आकाश सोनावणे, अजहर सय्यद,गुलजार खान आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असतो. आम्ही आतापर्यंत विभागातील 500 पेक्षा अधिक गरजू नागरिकांना अन्नधान्याचे किट घरोघरी पोहोचवले आहेत. तर प्रत्येक चाळीत आणि इमारतीत सॅनिटायझर आणि धुम्र फवारणी केली असून यापुढेही असेच सामाजिक कार्य करत राहणार असल्याची माहिती कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here