मुंबई (प्रमिला जाधव) – प्रभु रामचंद्र यांच्या मंदिराच्या पायाभरणीच्या शुभारंभ प्रसंगी माटुंगा येशिल दानशूर समाजसेवक विनय गठानी यांनी विभागात ठीकठिकाणी मिठाई आणि लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. प्रभूरामचंद्र यांच्या मंदिराची आज पायाभरणी होत असून ही आमच्यासाठी आणि समस्त हिंदू देशवासियांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. आज आम्हाला एवढा आनंद झाला आहे की तो आम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या आनंदाच्या सोहळ्यानिमित्ताने मी विभागात लाडू आणि मिठाई वाटपाचा कार्यक्रम ठेवला असल्याची माहिती दानशूर, समाजसेवक विनय गठानी यांनी दिली. त्यांच्या सोबत त्यांची संपूर्ण टीमने या कार्यात सहभागी झाली होती.







