वाघाची व बिबट्याची कातडी तस्करी करणारी टोळी पुण्यात जेरबंद

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : वन्यजीव गुन्हे नियंत्रण मुंबई यांचेकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाघाची व बिबट्याची कातडी तस्करी करणाऱ्या टोळीस पुणे वनविभागाचे पथकाने जेरबंद करुन त्यांच्या ताब्यातून एका बिबट्याची व दोन वाघांची कातडी, दोन कार, एक दुचाकी जप्त केल्याची माहिती पुणे विनविभागाचे उपवनसरंक्षक राहूल पाटील यांनी दिली आहे.

याप्रकरणी अनिकेत प्रमोद भोईटे (वय-२०), संदिप शंकर लकडे (३४), धनाजी नारायण काळे (३५) यांना वारजे परिसरात अटक करुन त्यांच्या ताब्यातून एक बिबटयाचे कातडे जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सासवड बसस्थानक येथे वाघाची व बिबटयाची कातडी तस्करी करणाऱ्यास आलेल्या टोळीस, वन विभागाचे पथकाने बनावट गिऱ्हाईक बनवून माहितीची खातरजमा करत सापळा रचून दोन कार मधील पाचजणांना अटक केली आहे.

सदर कारवाई सहा.वनसंरक्षक मयुर बोठे, आशुतोष शेंडगे, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपाल, वैभव बाबर, वनरक्षक सुरेश बर्ले, रामेश्वर तेलंग्रे, महादेव चव्हाण, रईस मोमीन, परमेश्वर वाघमारे, योगेश तिकोळे, अमोल गुरव, अमोल साठे यांचे पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here