लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवले

सुपा (प्रतिनिधी) : सुपा पोलिस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळुन नेले होते. सुपा पोलिसांनी तत्पर्ता दाखवत बारा तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले. याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की , शनिवारी (दि.१८) सुपा पोलिस स्टेशन हद्दीत एक अल्पवयीन मुलीला लग्नाची फुस लावून पळून नेले आहे. अशी फिर्याद देण्यात आली.

यावेळी सुपा पोलिसांनी वैभव बाळासाहेब नांदखिले रावांघुडें खुर्द यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला व ताबडतोब तपासाचे चक्रे फिरवली. मिळालेली माहिती व मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी पुण्याच्या दिशेने कुच्छ केले व पोलिस निरिक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे, उपनिरीक्षक तुळशीराम पवार, पोलिस नाईक कल्याण लगड, महिला पोलिस विजया पाटील यांनी वरील आरोपी नांदखिले यास पुणे कामशेत येथे पकडले.

अल्पवयीन मुलीला लग्नाच्या आमिषाने पळवणाऱ्या आरोपीला सुपा पोलिसांनी मोठ्या शिताफिने बारा तासांच्या आत पकडले असून पुढील तपास पी. आय. गोकावे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here