तरवाडे पेठेत ११ हजारांची देशी-विदेशी दारू जप्त

चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील तरवाडे येथे अवैद्य दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ११ हजार रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली.

चाळीसगाव ग्रामीण पोलीस काल रविवारी सकाळी साडेअकरा वाजता वाघळी परिसरात गस्तीवर होते. यावेळी त्यांना तरवाडे पेठ येथे बसस्थानकाजवळ देशी-विदेशी दारू ची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी ताबडतोब तेथे छापा टाकला असता, ११ हजार रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरगडे पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, बिभीशन सांगळे यांनी रविवारी सकाळी हा छापा टाकला. या छाप्यामध्ये देशी-विदेशी दारूच्या मोठ्या प्रमाणावर बाटल्या आढळून आल्या. एकूण ११ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान यावेळी संजय महादू चौधरी (५१,राहणार तरवाडे पेठ चाळीसगाव) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

ही कारवाई चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आणि संबंधित आरोपीवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here