महिलेला साडी नेसल्याने रेस्टॉरंटमध्ये नाकारला प्रवेश

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : प्रसिद्ध लेखिका आणि वक्त्या शेफाली वैद्य या नेहमीच विविध कारणांसाठी चर्चेत असतात. सोशल मिडीयावर त्या प्रचंड सक्रीय असतात. त्यांना ट्विटरवरदेखील बरेच फोलोअर्स आहेत. वैद्य यांनी नुकताच एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसून येत आहे.

व्हिडीओ शेअर करताना शेफाली वैद्य यांनी लिहिलेल्या कॅप्शननुसार, हा व्हिडीओ एका भारतातील रेस्टॉरंटमधील आहे. यामध्ये साडी नेसल्यामुळं एका महिलेला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. दरम्यान, शेफाली वैद्य यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध होऊ शकली नसली तरीही हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये साडी परिधान केल्यामुळं महिलेल्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकरण्यात आला. त्यावरुन महिला आणि रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांमध्ये वादही होत असल्याचं दिसत आहे. शेफाली यांनी व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं की, हे कोणी ठरवलं की, साडी ‘स्मार्ट वेअर’ नाही? मी यूएस, यूएई सोबतच यूकेमधील सर्वात उत्तम रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून गेले होते. तिथे मला कोणीच थांबवलं नाही. आणि हे रेस्टॉरंट भारतात असून, एक ड्रेस कोड ठरवतंय आणि स्वतःच ठरवतंय की, साडी ‘स्मार्ट वेअर’ नाही? हे विचित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here