पिडीत महिलेच्या तक्रारीनंतर आरळा येथील पोलीस पाटलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

शिराळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरळा पैकी भाडुगळेवाडी (ता. शिराळा) येथील पोलीस पाटील सुनील महादेव कदम (वय २५) याच्याविरोधात पीडित महिलेने कोकरूड पोलीसात दिली आहे.

आरळा येथील सुनील कदम हा पोलीस पाटील असून आपल्या पदाचा गैरफायदा घेत तो पीडित महिलेस सप्टेंबर २०२० पासून वारंवार त्रास देत होता. या महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज व फोटो पाठवून शारीरिक सुखाची मागणी करत होता. महिलेचा पती नोकरीनिमित्त मुंबई येथे असून सासू, सासरे वयोवृद्ध आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत सुनील कदमने पीडित महिलेवर घरी कोणी नसताना वारंवार बलात्कार केला. तसेच कोणास सांगितल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती.

अखेर हा सर्व प्रकार असह्य झाल्याने महिलेने बुधवारी कोकरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून सुनील कदमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here