दोन्ही मुलांचा आजारपणात मृत्यू झाल्याच्या दुःखात पित्याने केली आत्महत्या

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : मुलांच्या मृत्यूमुळे नैराश्यात असलेल्या पित्यानेही आपल्या आयुष्याची अखेर केली. पुण्यात राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन मुलांच्या निधनानंतर पित्याने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील किरकिटवाडी परिसरात राहत्या घरात गळफास घेत वडिलांनी आत्महत्या केली. संजीव दिगंबर कदम (वय ४० वर्ष) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

संजीव कदम यांचा चौदा वर्षांचा मुलगा आणि दहा वर्षांची मुलगी एक वर्षभरापूर्वी आजारपणामुळे मृत्युमुखी पडले होते. तेव्हापासूनच ते नैराश्यात होते. अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचलत गळफास घेतला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here