पुतण्याने केला काकूवर बलात्कार, व्हिडीओ बनवून केलं ब्लॅकमेल

रांची (झारखंड) : धनबाद येथे काकू आणि पुतण्याचे नाते आई आणि मुलाचे समजले जाते पण या नात्याला काळीमा फासणारी घटना येथे घडली आहे. शेतात भाजी तोडायला गेलेल्या काकूचा पाठलाग करत पुतण्या तिथे पोहोचला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचा व्हिडिओदेखील त्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट केला.

या घटनेने महिलेला जबर धक्का बसला आहे. नात्याने पुतण्या लागणारा हा तरुण आपल्यासोबत असं काही करेल, याची पुसटशी कल्पनादेखील आली नाही, अशी प्रतिक्रिया महिलेनं दिली आहे. हा तरुण येताजाता आपल्यावर लक्ष ठेऊन असे. सतत आपल्याकडे तो निरखून पाहत असे. मात्र नात्यातील तरुण असल्यामुळे आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. मात्र तरुणाने नात्याला काळीमा फासत महिलेवर बलात्कार केला. हे पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी सेक्स वर्कर तरुणीला घेरलं; धक्कादायक पोलिसांत तक्रार दाखल महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून पोलिसांनी औपचारिकता पूर्ण करत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तरुण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लवकरच या तरुणाला पकडून कायदेशीर कारवाई सुरु करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. कुटुंबातीलच व्यक्तीने असं लाजीरवाणं कृत्य केल्यामुळे गावात संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here