अफगाणिस्तानात रस्त्याच्याकडेला पेरून ठेवलेल्या सुरूंगाचा स्फोट; १ ठार ७ जखमी

जलालाबाद (अफगाणिस्तान) : येथे झालेल्या स्फोटात १ जण ठार आणि किमान ७ जण जखमी झाले आहेत, असे स्थानिक प्रसिद्धीमाध्यमांनी म्हटले आहे. वाहनांचा ताफा जात असताना रस्त्याच्या कडेला पेरून ठेवलेल्या सुरूंगाचा स्फोट झाला असे स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.

इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान (अफगाणिस्तानचे बदललेले नाव)ने या स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटात ठार झालेल्या मृतांमध्ये एका सामान्य नागरिकाचाही समावेश आहे, असेही या वृत्तात म्हटले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला जलालाबादेत झालेल्या अशाच एका अन्य स्फोटात तिघे जण ठार झाले होते. तर १९ जण जखमी झाले होते. या स्फोटानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी एका गॅस स्टेशनवर झालेल्या स्फोटात दोन समान्य नागरिक आणि एक तालिबानी जखमी झाले होते. या स्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here