अक्कलकोट पोलिसांनी तालुक्यात पकडली पाच ठिकाणी दारू

अक्कलकोट (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) : उत्तर पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी दिवसभरात हातभट्टी अड्ड्यांवर धाड टाकून १ हजार ६६ लिटर दारू जप्त केली, तसेच या कारवाईत ८ हजार ४४० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईत पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्कलकोट शहरात मार्केट यार्डाजवळ अडीच हजारांची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत पुतळाबाई राठोडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नायक आसिफ शेख करीत आहेत. आणखी एका कारवाईत कविता राठोडच्या हातभट्टी केंद्रावर धाड टाकून अडीच हजार रुपयांची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. याचा तपास हवालदार राजू फुलारी करीत आहेत.

बऱ्हाणपूर येथील आरोपी रहेमान फुलारी याच्या हातभट्टीवर कारवाई करून १० लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. तपास हवालदार प्रवीण वाळके करीत आहेत. वागदरी येथील आरोपी यलव्वा देवकरच्या दारू अड्ड्यावर धाड टाकून सहा लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल अंगद गिते करीत आहेत. माणिक पेठ अक्कलकोट येथील आरोपी राजू पुजारीच्या दारू विक्री ठिकाणी धाड टाकून ५० लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली. तपास पोलीस नायक शरद चव्हाण करीत आहेत. अशाप्रकारे पाच ठिकाणी एकाच दिवशी धाड टाकून १ हजार ६६ लिटर अवैध दारू जप्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here