पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; एक ठार

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरमधील कागदाचे मोठे रिळ कारवर पडून हा अपघात झाला आहे. हा अपघात पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ झाला असून अपघातामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ एका ट्रेलमधील कागदांचे मोठे रिळ कारवर पडले. या भीषण अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला. कंटेनरमधील कागदाचे मोठे रिळ महामार्गावर पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही.

mumbai-pune-highway-accident

अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, आयआरबी घटनास्थळी दाखल झाले आहे.अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात येत आहेत. तसेच महामार्गावर कागदाचे मोठे रिळ पडले असून ते बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here