भवानीपूर (पश्चिम बंगाल) : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जर मुख्यमंत्री पद टिकवायचे असेल तर भवानीपूरहून पोट निवडणूक जिंकणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चाखलेल्या ममतांना पुन्हा हरवण्यासाठी भाजपाने मोठी ताकद भवानीपूर मतदारसंघात झोकली होती. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर हल्ला झाला आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्यांच्या सुरक्षा रक्षकांना पिस्तूल काढावी लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही बाजुने एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपाने सांगितले की, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते भवानीपूरमध्ये प्रचार करत होते. त्यावेळी टीएमसीच्या कार्यकर्तांनी धक्काबुक्की केली. भाजपा खासदारासोबतही गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. टीएमसी एवढी घाबरलीय कशाला? नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवाचा राग टीएमसी इथे काढत आहे.
If @MamataOfficial and @abhishekaitc are so much confident of winning Bhawanipur by-poll by 1 lac margin, then why this kind of hooliganism is going on in the area?@BJP4Bengal leaders are being gheraoed. Why?
— Arjun Singh (@ArjunsinghWB) September 27, 2021
Is she fearing a repeat of Nandigram in Bhowanipur too?@ECISVEEP pic.twitter.com/cSB181b3Cp
दिलीप घोष यांनी म्हटले की, लढाई मोठी आहे. टीएमसी घाबरलीय. यामुळे ते आता मारहाणीवर आले आहेत. भाजपा खासदार अर्जुन सिंह प्रचार करत होते. तेव्हा टीएमसीचे काही लोक त्यांच्या मागे लागले. गो बॅकचे नारे देत होते. त्यांना धक्काबुक्की करून त्या भागातून जाण्यास भाग पाडले.






