पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )तर्फे ‘ जेम्स् फेस्टिव्हल ‘ २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे.
३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान हा फेस्टिव्हल होणार असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध १६ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती दिली.

या ‘ जेम्स् फेस्टिव्हल ‘ २०२१ मध्ये एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.






